वाचा:
मोहम्मद जाफर आणि विक्की हे दोघे १० ऑक्टोबर रोजी गोकुळपेठ बाजारात संशयास्पदरित्या फिरत होते. तिथे तैनात पोलिसांना त्यांचा संशय आल्याने पोलीस त्याच्या दीशेने गेले. पोलिसांना बघताच आरोपी घाबरून पळू लागले. पोलिसांनी घेराव घालून त्यांना ताब्यात घेतले व त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून ४ मोबाइल जप्त करण्यात आले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी तिबेटी स्वेटर मार्केटच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आणखी काही मोबाइल लपविल्याची माहिती प्राप्त झाली. या दोघांकडून एकूण सव्वा लाख रुपये किमतीचे १४ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.
वाचा:
दोघांची कसून चौकशी केली असता हे दोघे आंतरराज्यीय चोरटे असल्याचे लक्षात आले. हे दोघे विविध राज्यांमध्ये फिरून चोरी करतात. प्रामुख्याने मोबाइल चोरतात. चोरीचा माल झारखंडमध्ये जाऊन विकतात. त्यासाठी हे विमानाने प्रवास करतात. हे दोघे काही दिवसांपूर्वी कोलकात्याहून विमानाने नागपुरात आल्याचेही समोर आले आहे. ही कारवाई अंबाझरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंन्द्र हिवरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आशिष कोहळे, शरद मिश्रा आणि त्यांच्या चमूने केली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times