वाचा:
राज्यातील अजूनही अधिक आहे. राज्यात आज करोनामुळे १२७ जणांचा मृत्यू झाला असून सध्या २.६३ टक्के इतका मृत्यूदर आहे. गेल्या काही दिवसांपासून मृत्यूदरात काहीच घट दिसत नसल्याने ती फार मोठी चिंतेची बाब ठरली आहे. राज्यात आज सर्वाधिक १९ करोनामृत्यू महापालिका हद्दीत नोंदवले गेले. त्यानंतर मुंबई पालिका हद्दीत १७ रुग्णांचा मृत्यू झाला तर सातारा जिल्ह्यात १३ जणांचा मृत्यू झाला. पुणे शहरात मृत्यूचे प्रमाण कमी झाले असून आज ७ रुग्ण दगावले आहेत. राज्यात करोनामुळे आतापर्यंत ४५ हजार ८०९ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. त्यात सर्वाधिक १० हजार ५४२ मृत्यू मुंबई पालिका हद्दीत झाले आहेत.
वाचा:
राज्यात आज ४ हजार १३२ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात ४ हजार ५४३ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण १६ लाख ९ हजार ६०७ रुग्णांनी करोनाविरुद्धची लढाई जिंकली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) आता ९२.४८ टक्के इतके झाले आहे. राज्यात आतापर्यंत ९७ लाख २२ हजार ९६१ जणांच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील १७ लाख ४० हजार ४६१ (१७.९ टक्के) चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या ८४ हजार ८२ रुग्ण अॅक्टिव्ह रुग्ण असून या रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दुसरीकडे ८ लाख १९ हजार २६७ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ६ हजार १७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times