म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

दिवाळीच्या उत्सवातही करोनाच्या धोक्याचे भान नागरिकांना असल्याची जाणीव धनत्रयोदशीच्या दिवसाने करून दिली मात्र हे प्रमाण खूप कमी होते. दिवाळीच्या स्वागतासाठी पहाटेपासून सुरू होणारे शुक्रवारी ऐकू आले नाहीत. शुक्रवारी संध्याकाळी आजुबाजूची चाहूल घेत क्वचित फटाके वाजत होते. मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रदूषणही नियंत्रणात होते. मुंबईच्या शुक्रवारी १६२ होता.

राज्य सरकारचे आवाहन, क्षेत्रातील सार्वजनिक परिसर, खासगी परिसर इत्यादी सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत, असे जाहीर केल्याने नियमांचे फारसे उल्लंघन झाले नाही. पोलिसी कारवाईच्या भीतीने दरवर्षी होणारा फटाक्यांचा बेसुमार आवाज, आतषबाजी यावर नियंत्रण होते. काही ठिकाणी लहान मुले कमी आवाजाचे फटाके फोडताना दिसली. मात्र अनेक सोसायट्यांनीही फटाके न फोडण्याचे पत्रक जारी केल्याने त्याचेही पालन करण्यात आले. काही गुजरातीबहुल भागांमध्ये फटाके फोडण्यात आल्याचेही समोर आले. मुंबईमध्ये शुक्रवारी चेंबूर येथील हवेचा दर्जा अतिवाईट होता, तर मालाड, माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल येथे हवेची गुणवत्ता वाईट होती. गुरुवारपेक्षा हवेच्या गुणवत्तेत शुक्रवारी सुधारणा होती. मात्र ओझोनचा परिणाम दोन केंद्रांवर आढळून आला.

हवेचा दर्जा व (स्रोत ‘सफर’)

मुंबई – मध्यम (१६२)

कुलाबा – मध्यम (पीएम १०-१७५)

माझगाव – वाईट (पीएम २.५-३००)

वरळी – मध्यम (ओझोन- १६५)

चेंबूर – अतिवाईट (पीएम २.५-३१५)

वांद्रे-कुर्ला संकुल – वाईट (पीएम १०-२१८)

अंधेरी- मध्यम (पीएम १०-१५४)

भांडुप- समाधानकारक (ओझोन- ९८)

मालाड – वाईट (पीएम २.५-२३९)

बोरिवली- मध्यम (पीएम १०-१२९)

नवी मुंबई – मध्यम (पीएम १०-१३४)

अशी मोजतात श्रेणी

चांगली – ० ते ५०

समाधानकारक – ५१ ते १००

मध्यम – १०१ ते २००

वाईट – २०१ ते ३००

अतिवाईट- ३०१ ते ४००

धोकादायक – ४०१ ते ५००

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here