आणि संजय राऊत यांच्या मुलाखतीची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. यावेळी संजय राऊत कोणावर टीकेची तोफ डागणार याबाबतही उत्सुकता होती. सुशांतसिंह राजपूत प्रकरणा, कंगना राणावत, भाजप यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं होतं. यावरच संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
‘सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकरणावरून प्रश्न विचारला असता, संजय राऊत यांनी सुशांतला मी बिहारचा मानतच नाही. सुशांत मुंबईचा होता. त्याला बिहारमध्ये कोण ओळखत होतं. त्याला मुंबईत ओळख मिळाली, तो मुंबईचा मुलगा होता, त्याला न्याय देणे आमची जबाबदारी आहे. मात्र ओरडून सत्य लपणार नाही,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
‘जे समोर आहे त्यावर पडदा टाकून तुम्ही काय सत्य दाखवणार. मुंबई पोलीसांनी केलेला तपास योग्यच आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवायलाच हवा. मुंबई पोलीस देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस दल आहे. त्यांना माफिया बोलणं चुकीचं आहे. मुंबई पोलीस रक्षण करते हे लक्षात ठेवायला हवं,’ असा अप्रत्यक्ष टोला भाजप व कंगनाला लगावला आहे.
म्हणून सामनाचं शीर्षक उखाड दिया असं दिलं
मुंबई महापालिकेनं कंगनाच्या घरावर केलेल्या कारवाईनंतर करंगनानं संजय राऊत यांच्यावर थेट आरोप केले होते. तसंच, त्यांना कोर्टातही खेचलं होतं. त्यानंतर सामनाच्या लेखाचं शीर्षक उखाड दिया, असं केलं होतं. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कंगनानं मुंबईत येताना म्हटलं मी मुंबईत येत आहे, काय उखाडायचं आहे ते उखाडा. त्यानुसार कंगनाच्या इच्छेनुसार मुंबई महापालिकेनं जेसीबी चालवून उखाडून दाखवलं आहे. त्यानुसार सामनाने वृत्तांकन केलं आणि शीर्षक उखाड दिया असं केलं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times