मुंबईः रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपनं राज्य सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. अन्वय नाईक कुटुंबीय आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यावरून नाईक कुटुंबीयांनी खुलासा केला होता. यानंतर भाजप नेते यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

रश्मी आणि अन्वय नाईक यांच्यातील नऊ जमीन व्यवहारांचे सातबारा उतारे आम्ही सादर केले आहेत, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. या आरोपांवर उत्तर देताना आज्ञा नाईक यांनी यांनी सोमय्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच, याच्यात गुपीत असं काहीच नाही, त्यांनी आमच्याकडून जागा विकत घेतली आणि आम्ही ती दिली, असा खुलासा त्यांनी केला आहे. यावरूनच निलेश राणे यांनी ठाकरे कुटुंबासोबत केलेल्या जमीन व्यवहारावर नाईक कुटुंबीयांनी खुलासा केला, असं त्यांनी म्हटलं आहे.

वाचाः

‘नाईक कुटुंबाला इतकी मिरची लागली की आरोप झालेत ठाकरे कुटुंबावर आणि उत्तर देतायत नाईक कुटुंब. मोठा झोल झाल दिसतोय. फारच जवळचे संबंध दिसतायत,’ असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.

वाचाः

संजय राऊत यांचा इशारा

खुलासा कोणी करावा आणि कशासाठी करावा, हे शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते सांगणार नाहीत, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुळात अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचे प्रकरण आहे. त्यावर मी बोलत नाही. पण एक आमची मराठी भगिनी, तिचे कुंकू पुसले गेले. त्या स्वतः आणि त्यांची कन्या, या गेल्या अनेक महिने न्यायासाठी आक्रोश करत आहेत. त्यावर हे शेठजींच्या पक्षाचे व्यापारी, प्रवक्ते बोलायला तयार नाहीत. आम्ही त्या अबलेला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत, तर तपासाची दिशा भरकटून टाकण्यासाठी हे शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते असे मुद्दे घेऊन समोर येत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे राऊत म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here