मुंबईः ‘सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबीयांवर केलेल्या आरोपांबाबत आम्ही काही बोलावं, असं कोणतंही महान कार्य त्यांनी केलेलं नाही,’ असा टोला यांनी सोमय्या यांना लगावला आहे.

यांनी ठाकरे कुटुंबीयांवर केलेल्या आरोपांचा संजय राऊत यांनी आज समाचार घेतला आहेत. ठाकरे कुटुंब आणि नाईक कुटुंबीयांमध्ये २१ जमीनींचे व्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलं आहे. किरीट सोमय्या यांच्या या आरोपांनंतर शिवसेने नेत्यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. तर, संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना त्यांच्याच शैलीत उत्तर दिलं आहे.

वाचाः

‘किरीट सोमय्या यांनी खोटे-नाटे आरोप करणं बंद करावं. जुनी थडगी त्यांनी उकरुन काढून नयेत, कारण आम्हालाही थडगी उकरुन काढता येतात. पण आम्ही उकरली तर त्यात तुमच्या पापांचेच सांगाडे जास्त सापडतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसंच, सोमय्या यांच्याकडे त्यांच्या पक्षही गांभीर्याने पाहत नाही. यामुळं अशा विधानांमुळं आपल्याच पक्षावरील लोकांचा विश्वास उडतो,’ असंही राऊत म्हणाले आहेत.

वाचाः

‘महाराष्ट्रात सरकार पाडण्यासाठी विरोधकांनी वर्षभरात अनेक ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला पण सरकारला थोडंही खरचटलं नाही. त्यामुळं त्यांनी ही भाषा बंद केली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी विरोधी पक्षानं सहकार्याची भावना ठेवावी,’असंही राऊत म्हणाले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here