मुंबईः अमेरिकेचे माजी राष्ट्रपती यांनी आपल्या पुस्तकात काँग्रेसचे माजी अध्यक्ष यांच्याविषयी केलेल्या टिप्पणीवर शिवसेनेनं भाष्य केलं आहे. एका पत्रकार परिषदेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी ओबामा यांच्या पुस्तकाबद्दल भाष्य केलं आहे.

बराक ओबामा यांचे ‘अ प्रॉमिस्ड लॅण्ड’ नावाचे पुस्तक नुकतेच बाजारात आले. त्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा उल्लेख आहे. ओबामा यांनी राहुल गांधी यांना कमी योग्यता असलेला नेता म्हटले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी ओबामा यांच्या या टिपण्णीवर नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, ओबामा यांना भारतीय नेत्यांविषयी बोलण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे.

‘परदेशी राजकारणी भारतातील नेत्यांविषयी अशी मते देऊ शकत नाही. ओबामा यांना या देशाबद्दल किती माहिती आहे? असा रोखठोक सवाल करताच राऊतांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. ओबामांनी एक वक्तव्य केलं अनि इथल्या नेत्यांनी त्याचं राजकारण केलं, ही गोष्टी चुकीची आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

वाचाः

काय आहे पुस्तकात?

बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकात राहुल गांधी यांचा उल्लेख करताना ते ‘नर्व्हस’ असलेले व्यक्ती असल्याचे राहुल यांच्या बाबतीत नमूद केले आहे. ओबामा यांनी राहुल यांची तुलना अशा विद्यार्थ्याशी केली आहे, जो शिक्षकांना काम केल्यानंतरही प्रभावित करण्यात अपयशी ठरला. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्याबाबत भावहीन, शांत आणि अगाध निष्ठा असलेले व्यक्ती असं, नमूद करीत त्यांची स्तुती केली आहे.

वाचाः

सोशल मीडियावर ट्रेंड

दरम्यान, ओबामा यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत राहुल गांधी यांच्या विरोधकांनी पुन्हा एकदा त्यांना लक्ष्य केले आहे. त्यांच्या पुस्तकाचा आधार घेत भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी पुन्हा एकदा राहुल यांच्यामुळे देशाची फजिती झाल्याचे नमूद केले. त्यानंतर ट्विटरवर राहुल यांच्या विरोधातील ट्रेण्ड सुरू झाला. त्यावर अनेकांनी ‘पप्पुमुळे देशाची इभ्रत गेली’, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दुसरीकडे सोशल माध्यमावर #माफ़ी_माँग_ओबामा हा ट्रेण्डदेखील दिवसभर सुरू होता. त्यावर लोकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ‘ओबामा राहुल यांच्याबद्दल असे बोलूच कसे शकतात. राहुल आणि गांधी परिवार सध्या माझे देव आहेत’, अशा आशयाचे मिम्स विरोधकांनी पोस्ट केलेत.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here