अंबाजी कल्याणी शिंगे (वय २१, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी शिंगेवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हत्यार बाळगल्याचा; तर मुंढवा पोलिस ठाण्यात एक खंडणीचा गुन्हा दाखल आहे. तक्रारदार घोरपडी पेठ परिसरात राहतात; तर आरोपी शिंगे पूर्वी घोरपडी पेठेत शाळेला असताना त्याला तक्रारदार यांच्याविषयी माहिती होती.
त्याने ऑगस्ट महिन्यात पिस्तुलाचा धाक दाखवून तक्रारदार यांना ३५ लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी त्याला मुंढवा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता. बुधवारी सकाळी तक्रारदार त्यांच्या दुचाकीवरून वानवडी येथील क्लोव्हर बेलवेडर सोसायटी समोरून जात होते. त्या वेळी शिंगे आणि त्याच्या साथीदाराने तक्रारदार यांना रस्त्यात गाठले. त्यांना पुन्हा जीवे ठार मारण्याची धमकी देऊन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पाच ते दहा लाख रुपयांची खंडणी मागितली.
तक्रारदार यांनी आपल्या पुतण्याला फोन लावला. त्यांच्या पुतण्याने मित्रांना बरोबर घेतले. तक्रारदार यांनी सांगितलेल्या ठिकाणी पोहचून त्या सर्वांनी शिंगेला पकडून वानवडी पोलिसांच्या हवाली केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times