रवी माणिक राठोड ( वय ३८, राहणार वारजेवाडी पुणे ) आणि बुद्धिबाई चन्ना पालत्या ( वय ४८, राहणार वारजेवाडी पुणे ) आणि एक अनोळखी पुरुष अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.तर रामलू धनसिंग राठोड,रामलू सोमनाथ राठोड,आशा सुभाष राठोड,लोकेश धनसिंग राठोड,किसान रामलू राठोड,निलेश भानू राठोड , किसन नारायण राठोड,असलीबाई किसन राठोड ( सर्व राहणार वारजेवाडी पुणे ) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कात्रज येथे मोलमजुरीसाठी गेलेल्या तेलंगणा येथील सुकट्या नुरया खतरावत याचे अपघातामुळे निधन झाले होते. नातेवाईक त्याचा मृतदेह घेऊन पुण्याहून अँब्युलन्समध्ये ( एम. एच. १२,आर. एन. ६३८७ ) तेलंगणाकडे निघाले होते. शनिवारी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास अँब्युलन्स मोहोळ शहराजवळील कन्या प्रशाला चौक येथे आल्यानंतर सोलापूरच्या दिशेने निघालेल्या धावत्या ट्रकला ( एम.एच. ४३,बी. जी. ४५०० , चालक नागनाथ गंगाधर कदम,वय ४०,राहणार मळेगाव, तालुका लोहारा,जिल्हा उस्मानाबाद ) या अँब्युलन्सची पाठीमागून जोरदार धडक बसली.
या भीषण अपघातात अँब्युलन्समधील १३ लोक गंभीर जखमी झाले. पोलीस निरीक्षक अशोक सायकर,अवि शिंदे,गणेश दळवी,मंगेश बोधले,सतीश पवार,पोलीस वाहनाचे चालक अवघडे,सतीश पवार,ग्रामसुरक्षा दलाचे पथक आदींनी महामार्ग पोलीस व टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने मोहोळ पोलिसांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरु असतानाच अँब्युलन्स चालकासह तिघांचा मृत्यू झाला. अपघातामध्ये अँब्युलन्सच्या समोरच्या भागाचा पूर्णपणे चुराडा झाला होता. अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून अधिक तपास हवालदार अविनाश शिंदे हे करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times