मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांची ओळख सुसंकृत राजकारणी म्हणून असली तरी त्या पलीकडेही राज यांचे क्रिडा प्रेम आणि साधेपणाची नेहमीच चर्चा होती. दिवाळीतही राज यांच्यातील साधेपणाची झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

राज ठाकरे स्वतःला फिट ठेवण्यासाठी हल्ली नियमितपणे टेनिस खेळायला सुरुवात केली आहे. जिमखान्यात ते रोज संध्याकाळी टेनिस खेळण्यासाठी जातात. गुरुवारीही ते नेहमीप्रमाणे टेनिस खेळण्यासाठी गेले असताना. त्यावेळी शिवाजी पार्क परिसरात काम करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली होती. राज ठाकरे यांनीही त्यांच्या विनंतीलला मान देत फोटो काढण्यास परवानगी दिली आहे.

राज ठाकरे यांच्या या फोटोची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष, म्हणजे राज ठाकरे यांनी मोठ्या मनाने कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवत दिलखुलासपणे फोटो काढला. राज ठाकरे यांच्या याच कृतीमुळं त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मनसे नेते सचिन मोरे यांनी त्यांच्या फेसबुकवर राज ठाकरेंचा फोटो पोस्ट केला आहे.

माणूसकी जपणारा संवेदनशील नेता, असं म्हणत सचिन मोरे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टची सुरुवात केली आहे. तसंच, मुंबई दिवसरात्र स्वच्छ ठेवणा-या या सफाई कर्मचाऱ्यांना या फोटोच्या माध्यमातून खऱ्या अर्थांने कोविड योध्दा असलेल्याच प्रशस्तीपत्रक दिवाळीत मिळालं हे समजायला हरकत नाही, असंही म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here