लोंगेवाला चौकी, जैसलमेर सीमाः पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा आपली दिवाळी जैसलमेरमध्ये लोंगेवाला पोस्टवर तैनात जवानांसोबत साजरी करत आहेत. जवानांना संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी साम्राज्यवादी चीनवर जोरदार हल्ला केला. साम्राज्यवाद ही अठराव्या शतकातील विचारसरणी आहे. या विचारात मानसिक विकृती आहे आणि यामुळे संपूर्ण जगाला याचा सामना करावा लागतोय.

चीन-पाकिस्तानचं नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी हल्ला चढवला. समजून घेणं आणि समजावण्यावर भारत विश्वास ठेवतो. पण कोणी भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तरही जबरदस्त असेल, असं मोदींनी सुनावलं. जवानांना संबोधित केल्यानंतर ( ) स्वार झाले होते.

भारत आणि पाकिस्तानमधील अभूतपूर्व युद्धाचा साक्षीदार आणि भारतीय जवानांच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या लोंगेवाला सीमेवर जवानांना मोदींनी संबोधित केलं. भारता आज हितासाठी कुठल्याही स्थितीत समझौता करतणार नाही. हे आता जग समजून घेत आहे, असं मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मिठाईही भेट दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here