गणेश दुर्गाडे हा नावडे येथील तरुण एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. गुरुवारी सकाळी त्याचे पत्नी अर्चनासोबत कडाक्याचे भांडण झाले. त्याने किचनमधील चाकूने तिच्यावर हल्ला केला. तिच्यावर वार केले. यात तिच्या मानेवर, पोटावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. ती हल्ल्यातून बचाव करण्यासाठी घराबाहेर धावत आली. तिने मदतीसाठी धावा केला. मात्र, त्याने तिला पकडले आणि तिच्यावर पुन्हा हल्ला केला.
त्यानंतर दुर्गाडे हा घटनास्थळावरून पळाला. त्याने धावत्या ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केली. दुसरीकडे घरी जखमी अवस्थेत पडलेल्या अर्चनाला शेजाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिचा जबाब नोंदवून घेता आला नाही. या दाम्पत्याला एक वर्षांची मुलगी आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times