म. टा. प्रतिनिधी, : जामिनावर कारागृहातून बाहेर पडल्यानंतर सराईत आणि त्याच्या दहा ते बारा साथीदारांनी ते अशी दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन रॅली काढली. या रॅलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी या सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या गंभीर गुन्हातील हे सराईत गुन्हेगार आहेत.

शुभम कैलास कामठे (वय २६, रा. कदमवाकवस्ती ता. हवेली) असे या गुन्हेगाराचे नाव असून, कामठे याच्या स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी शुभम कामठे याच्यासह ऋषिकेश सुरेश पवार, राज रवींद्र पवार, संकेत सुनील गायकवाड, अक्षय कांबळे, समीर हाश्‍मी (रा. सर्व कदमवाकवस्ती, ता.हवेली) व पाच अनोळखी अशा अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार रोहिदास पारखे यांनी तक्रार दिली आहे.

शुक्रवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. कदमवाकवस्ती येथील अट्टल गुन्हेगार शुभम कामठे हा खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा अशा विविध गुन्ह्यांत अडीच वर्षांपासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. शुभम कामठे यास न्यायालयाने जामीन दिल्याने, शुक्रवारी (ता. १३ नोव्हेंबर ) दुपारी त्याची सुटका झाली. सुटका होऊन कारागृहाबाहेर पडताच, ऋषिकेश सुरेश पवार, राज रवींद्र पवार, संकेत सुनील गायकवाड, अक्षय कांबळे, समीर हाश्‍मी व त्याच्या कांही साथीदारांनी येरवडा कारागृह ते लोणी काळभोर या दरम्यान दुचाकी व चारचाकी वाहनांची रॅली काढून कामठेला घरी आणले. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here