मुंबई : आज शनिवारी संध्याकाळी मुहूर्ताला सेन्सेक्स आणि निफ्टीने दणक्यात सुरुवात केली आहे. सूर होताच सेन्सेक्सने ३६५ अंकांची झेप घेतली आहे. तो ४३७०९ अंकांवर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ८१ अंकांनी वधारला असून १२८०१ अंकावर आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी आता रेकॉर्ड स्तरावर आहेत. संध्याकाळी ७.१५ पर्यंत सुरु राहणार आहे.

सध्या बाजारात जवळपास सर्वच क्षेत्रात खरेदीचा ओघ सुरु आहे. दोन्ही निर्देशांकांनी आपली सर्वोत्तम पातळी गाठली आहे. सेन्सेक्समधील ३० पैकी २७ शेअर तेजीत आहेत. ज्यात एफचडीएफसी, एचडीएफसी बँक, सन फार्मा, टाटा स्टील, इंडसइंड बँक, एचसीएसल टेक, महिंद्रा अँड महिंद्रा, ऍक्सिस बँक, एचयूएल, बजाज ऑटो, मारुती, इन्फोसिस या शेअरमध्ये वाढ झाली आहे.

दिवाळीच्या दिवशी स्टॉक मार्केट बंद असले तरी, मुहूर्त ट्रेडिंग सेशन्स जवळपास एक तासासाठी सुरू राहते. मुहूर्त ट्रेडिंगची वेळ दरवर्षी बदलत राहते. त्या दिवसातील शुभ समजल्या जाणा-या वेळेनुसार, ही वेळ ठरवली जाते. व्यापारी समुदाय जवळपास निम्म्या शतकापेक्षा जास्त काळापासून ही परंपरा पाळत आहेत. १९५७ पासून बीएसई हे विशेष ट्रेडिंग सेशनचे आयोजन करत आहे. त्यानंतर १९९२ पासून एनएसईद्वारे याचे आयोजन होत आहे. या वर्षी स्टॉक एक्सचेंज १४ नोव्हेंबर रोजी शनिवारी संध्याकाळी ६.१५ ते ७.१५ दरम्यान याचे आयोजन करणार आहे.

मागील सत्रातील नफावसुलीतून सावरल्लेया सेन्सेक्स आणि निफ्टीने शिक्रवारी मात्र सकारात्मक शेवट केला. दिवसभरात ५०० अंकांचा चढउतार अनुभवणारा सेन्सेक्स ८५ अंकांच्या वाढीसह ४३४४३ अंकावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा
२९ अंकांच्या वाढीसह १२७१९ अंकावर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीने संवत्सर २०७६ या सरत्या वर्षाला तेजीने निरोप दिला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here