बालासोर: डोळ्यांची पापणी लवते न लेवते तोच ड्रोन सारख्या पायलटरहित यानांना टिपणाऱ्या क्षेपणास्त्रांचे (QRSAM) भारताने परीक्षण केले. हे परीक्षण ओडिशाच्या बालासोर येथे केले गेले. परीक्षणादरम्यान क्षेपणास्त्रांनी लक्ष्याला अचूकपणे टिपले. ओडिशाच्या आयटीआर चांदीपूर परीक्षण रेंज येथून दुपारी ३.५० वाजता हे परीक्षण केले गेले.

हे क्षेपणास्त्र सिंगल स्टेज सॉलिड प्रोपलेंट रॉकेट मोटरद्वारे संचलित आहे. या क्षेपणास्त्राच्या सर्व प्रणाली स्वदेशनिर्मित आहेत. बॅटरी मल्टिफंक्शन रडार, बॅटरी सर्व्हिल्न्स रडार, बॅटरी कमांड पोस्ट वेहिकल आणि मोबाइल लाँचर ही QRSAM मध्ये वापरण्यात आलेली सर्व उपकरणे भारतातच तयार करण्यात आली आहेत. आकाशात गतीमान असलेल्या लक्ष्यालाही अचूकपणे टिपण्याची या क्षेपणास्त्रात क्षमता आहे.

हे क्षेपणास्त्र लक्ष्य शोधून त्याच्यावर नजर ठेवू शकते. तसेच ते त्याला उद्ध्वस्त करू शकते. ही प्रणाली भारतीय लष्कराच्या हल्ला करणाऱ्या तुकडीला हवाई संरक्षण प्रदान करण्यासाठी खास तयार करण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र एका जमिनीवरून मारा करू शकणाऱ्या मोटरद्वारे डागले गेले. या क्षेपणास्त्रात सर्व स्वदेशी उप प्रणालींचा वापर करण्यात आला आहे.

हे क्षेपणास्त्र मोबाइल प्रक्षेपणाचा वापर करत डागले जाऊ शकते. परीक्षणासाठी QRSAM हत्यार प्रणालीच्या बॅटरी, मल्टिटास्किंग रडार, बॅटरी देखरेख रडार, बॅटरी कमांड पोस्ट यान आणि मोबाइल प्रक्षेपक तैनात करण्यात आले होते. रडारने दूरूनच लक्ष्य ओळखले आणि ते मारक सीमेत आल्यानंतर क्षेपणास्त्र डागले गेले. या क्षेपणास्त्राने थेट लक्ष्यावर प्रहार केले आणि त्याला उद्ध्वस्त करून टाकले.

क्लिक करा आणि वाचा-

डीआरडीएल, आरसीआय, एलआरडीई, आरअँडडीई (ई), आयआरडीई आणि आयटीआरसारख्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाच्या विविध प्रयोगशाळांनी या परीक्षणात भाग घेतला. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी आहे आणि यात इलेक्ट्रो मॅकॅनिकल अॅक्च्युएशन (ईएमए) सक्रिय आरएफस्पीकर ही प्रणाली बसवण्यात आली आहे. यशस्वी परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, डीडीआरअँडडीचे सचिव आणि डीआरडीओचे प्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी यशस्वी परीक्षणाबाबत डीआरडीओच्या वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here