वाचा:
राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका असल्याचे आरोग्य विभागाकडून वारंवार सांगितले जात आहे. ही लाट आल्यास त्याला तोंड देण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा आतापासूनच सज्ज झालेली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनाही सातत्याने खबरदारी बाळगण्याचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दिवाळीचा उत्साह भविष्यातील संकटाचे कारण ठरू नये, असे नमूद करत गर्दी टाळा, मास्क वापरा आणि हात धूत राहा, अशी विनंती खु्द्द मुख्यमंत्री यांनीही केलेली आहे. असे असताना गेले काही दिवस बाजारांमध्ये मोठी गर्दी उसळत असल्याने त्याबद्दल सर्वांनाच चिंता वाटू लागली आहे.
वाचा:
ऐन दिवाळीत करोनाचे आकडेही काळजीत भर घालणारे ठरत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आज अचानक खूप खाली आले आहे. राज्यात आज फक्त २ हजार ७०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले तर त्याचवेळी ४ हजार २३७ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण १६ लाख १२ हजार ३१४ करोना बाधित रुग्णांनी करोनाला मात दिली असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.४१ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज १०५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील २.६३ टक्के एवढा आहे. राज्यात करोना संसर्गाने आतापर्यंत ४५ हजार ९१४ जणांचा बळी घेतला आहे. सध्या राज्यात ८५ हजार ५०३ अॅक्टिव्ह रुग्ण असून या रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. आजचा अपवाद वगळल्यास गेल्या काही दिवसांपासून अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत दररोज खूप मोठी घट होताना दिसले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times