नवी दिल्ली: भारतीय संघाचा कर्णधार सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारतीय संघ प्रत्येकी ३ वनडे आणि टी-२० आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघ सध्या १४ दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये आहे. त्यानंतर सामन्यांना सुरूवात होईल.

वाचा-

शनिवारी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावरून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. विराटने एक व्हिडिओ शेअर केला. यात त्याने फटाके न फोडता साजरी करण्याचे आव्हान केले. पण विराटचा हा मेसेज अनेकांना आवडला नाही.

वाचा-

तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबांकडून दिवाळीच्या शुभेच्छा. देव तुमाला आनंद, सुख आणि समृद्धी देवो. प्लीझ हे लक्षात ठेवा या दिवाळीत फटाके फोडू नका आणि पर्यावरण सुरक्षित ठेवा. तुमचे कुटुंब आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांसोबत या सणाचा आनंद घ्या.

वाचा-

व्हिडिओच्या अखेरमध्ये दिवे लावा आणि मिठाईसह दिवाळी साजरी करा, काळजी घ्या!

वाचा-

विराटच्या या मेसेजमध्ये काही लोकांना त्याचा फटाके न फोडण्याचे आवाहन आवडले नाही. यावरून काही लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

एका युझरने विराटला एक जुना फोटो शेअर करत गाडी चालवल्याने आणि एसी वापरण्याचा पर्यारणाचे नुकसान होते, असा सल्ला दिला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here