सिडनी: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. संघातील खेळाडू सिडनीमधील ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्याच्या जवळ एक झाला. यामुळे हॉटेलमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले होते. संबंधित हॉटेलपासून हा अपघात ३० किलोमीटर अंतरावर झाला.

वाचा-

सिडनी मधील ऑलिंपिक पार्क हॉटेलमध्ये भारतीय संघातील खेळाडू थांबेल आहेत. या हॉटेलमध्ये काही स्थानिक क्रिकेटपटू आणि काही फुटबॉलपटू देखील थांबेल आहेत. क्रोमर पार्क येथे हा विमान अपघात झाला त्यामुळे क्वारंटाइनमध्ये असलेल्या या खेळाडूंमध्ये भिती निर्माण झाली. क्रोमर पार्क या मैदानावर एक स्थानिक क्रिकेट आणि फुटबॉल सामना सुरू होता. विमान खाली येताना पाहून मैदानावरील खेळाडू देखील घाबरले.

वाचा-

स्टाफ डॉट को डॉटची बोलताना क्रोम क्रिकेट क्लबचे सिनिअर व्हाइस प्रेसिडेंट ग्रेग रोलिंस म्हणाले, शेडमध्ये जे खेळाडू होते त्यांना मी ओरडून सांगितले की पळा, पळा. त्यानंतर सर्व खेळाडू पळण्यास सुरूवात केली. आम्ही सर्व जण ओरडून पळू लागलो. विमान शेडच्या वरून गेले, असे एका खेळाडूने सांगितले.

वाचा-

अपघातग्रस्त झालेले विमान एका प्रशिक्षण शाळेचे होते. इंजिनमध्ये काही बिघाड झाल्याने त्याचा अपघात झाला. या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत. विमानातील अन्य सर्व जण सुरक्षित आहेत.

वाचा-

विमान मैदानाच्या दिशेने येताना पाहून उपस्थित असलेल्या सर्वांनी पळ काढला. मैदानात तेव्हा बरेच जण उपस्थित होते.

वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here