वाचा:
राज्यामध्ये संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले. त्यासोबतच सर्व प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली होती. मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथील केले. मात्र प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. दुसरीकडे राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यात यावी, अशी मागणी , वंचित बहुजन आघाडी अशा विविध पक्षांकडून करण्यात येत होती. आमदार रोहित पवार यांनीही मंदिरे उघडण्याबाबत आपले मत व्यक्त करताना एक ट्वीट १५ ऑगस्टला करीत राज्य सरकारचे याकडे लक्ष वेधले होते.
वाचा:
‘मंदिरं आणि धार्मिक स्थळं लोकांसाठी खुली करायला पाहिजेत, असं माझंही म्हणणं आहे. कारण त्या भागात असलेल्या अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्यामुळं याबाबत मी जरूर पाठपुरावा करीन,’ असे रोहित पवार यांनी १५ ऑगस्टला केलेल्या ट्वीटमध्ये नमूद केले होते. त्यातच आता पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील धार्मिक स्थळे खुली होणार आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः याबाबत घोषणा केली. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे रोहित पवार यांनी स्वागत केले आहे. मात्र यानिमित्ताने आपली जबाबदारी वाढली असल्याचे रोहित यांनी सांगितले आहे. याबाबत आज एक ट्वीट रोहित यांनी केले असून, ‘ पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील धार्मिक स्थळं व प्रार्थना स्थळं उघडण्याचा राज्य सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. पण करोनाचं संकट अद्याप कायम असल्याने आता आपली जबाबदारी अधिक वाढलीय. म्हणून मास्कचा वापर करणं, शारीरिक अंतर ठेवणं आणि गर्दी टाळावी लागेल, याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही,’ असे पवार यांनी म्हटले आहे. धार्मिक स्थळं उघडण्याबाबत आजचे ट्वीट करताना रोहित पवार यांनी १५ ऑगस्टला केलेल्या ट्वीटची आठवण करून दिली आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times