मुंबई: ‘राज्यातील सरकार पाडणार’, असे कोणीही बोललेले नसताना त्यांनाच केवळ तशा भीतीने ग्रासले आहे. त्यातूनच त्यांनाच हे सरकार पडणार अशी भीती सारखी वाटत असावी’, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते यांनी लगावला आहे. ( replied to ‘s allegations )

वाचा:

नेते यांना माध्यमांशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही, पोटशूळ बाहेर काढल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नाही. सरकारने एक वर्षे पूर्ण केल्याचे राऊत सांगत आहेत, पण सरकारचा कारभार कोणीही करीत असतो, गाडी पुढे जात असते, पण या एका वर्षात काय केले ते सांगा?, असा सवालच प्रवीण दरेकर यांनी केला आहे. सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नाही. शेतकरी अतिवृष्टीने हैराण झाला आहे, कोकणात निर्सग वादळात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, कामगार बेजार आहे, बेरोजगारीचे करार करतात पण प्रत्यक्षात काही होत नाही, आजही कोविड नियंत्रणात आणू शकले नाहीत, या परिस्थितीत आमच्या सरकारने एक वर्षे पूर्ण केले अशा नुसत्याच गमजा ते मारत आहेत, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

वाचा:

‘ ऑपरेशन लोटस ‘बाबत आम्ही काहीच बोललो नाही. असे असताना ‘साधे खरचटले नाही’ अशी भाषा केली जाते, असे नमूद करत भाजपाने काही ठरविलेच तर खरचटायचे सोडाच, तुम्ही रक्तबंबाळ व्हाल, असा इशारा दरेकर यांनी दिला. थडगी उकरून काढण्यची भाषा राऊत करीत आहेत, पण बोलायाला फक्त त्यांनाच येते असे त्यांनी समजू नये. सगळ्यांना बोलायला येते. मग थडगी काय आणि दुसरे काय सर्वांनाच पर्दाफाश करता येईल, त्यामुळे कोणी आव्हान देण्याची भाषा करू नये, अशा शब्दांत दरेकर यांनी संजय राऊत यांच्या किरीट सोमय्यांबद्दल विधानाला प्रत्युत्तर दिले.

वाचा:

काय म्हणाले संजय राऊत?

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी विरोधकांनी वर्षभरात अनेक ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला पण सरकार पडणार वगैरे दूरच राहिलं, सरकारला साधं खरचटलंही नाही. त्यामुळे भाजपने आता सरकार पाडण्याची भाषा बंद केली पाहिजे व राज्याच्या कल्याणासाठी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला होता. यांनाही राऊत यांनी इशारा दिला होता. खोटे-नाटे आरोप करणे बंद करा. जुनी थडगी उकरुन काढाल तर आम्हालाही थडगी उकरून काढता येतात हे ध्यानात ठेवा. आम्ही थडगी उकरून काढली तर त्यात तुमच्या पापाचेच सांगाडे जास्त सापडतील, असे राऊत म्हणाले होते. त्यावर दरेकर यांनी पलटवार केला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here