वाचा:
करोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय होताच अंबाबाई मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. नवरात्रोत्सव काळातही भाविकांना देवीचे दर्शन घेता आले नाही. आता मंदिर खुले करण्याचा निर्णय झाला असल्याने सोमवारपासून भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार यांनी सांगितले. यासाठी रविवारी देवस्थान समितीच्या सदस्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत गर्दीवर नियंत्रण आणण्याबरोबरच करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यावर चर्चा करण्यात येणार आहे.
वाचा:
पंढरीत फटाक्यांची आतषबाजी
पंढरपूर: करोनाच्या संकटामुळे १७ मार्च रोजी बंद झालेले दिवाळीच्या पाडव्याला उघडण्याची घोषणा झाल्यानंतर पंढरपूरमध्ये वारकरी संप्रदाय , व्यापारी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि मनसेने शहरात फटाक्यांची आतषबाजी करीत ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला. करोनाचे संकट सुरू झाल्यानंतर तब्बल ८ महिन्यानंतर देव आपल्या लाडक्या भक्तांना भेटणार असून भाविकांनाही आता सावळ्या विठुरायाचे मुखकमल बघण्याची ओढ लागली आहे. मंदिर बंद असूनही रोज हजारोच्या संख्येने भाविक मंदिराजवळ येऊन नामदेव पायरीचे दर्शन घेऊन जात होते. मंदिर उघडण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अनेक आंदोलने केली मात्र, मुख्यमंत्री यांनी हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधत मंदिरे उघडण्यास परवानगी दिल्याने वारकरी संप्रदायातून याचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.
वाचा:
जन-कीर्तनासही परवानगी द्या!
विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीजवळ प्रकाश आंबेडकर यांच्या समर्थकांनी सरकारचा निर्णय येताच फटाक्यांची आतषबाजी केली. त्यानंतर व्यापारी संघटना, मनसे आणि वारकरी संप्रदायांनी पेढे वाटून आणि फटाके उडवून जल्लोष केला. मंदिराच्या पश्चिम द्वार व्यापारी संघटनांनी विठुरायाची मूर्ती आणून तिला हार घालीत पेढे वाटले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निर्णयाचे वारकरी संप्रदायाने स्वागत करताना आता मर्यादित संख्येत करोनाचे नियम पाळून भजन-कीर्तनासही परवानगी देण्याची मागणी केली. दरम्यान, शासनाच्या मार्गदर्शक सूचना मिळताच भाविकांच्या दर्शन व्यवस्थेसाठी आम्ही सज्ज असून आमची तयारी यापूर्वीच झाल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले. मंदिरात येणाऱ्या भाविकाला मास्क बंधनकारक केला जाणार असून दर्शन रांगेत सोशल डिस्टन्सचे नियम पाळण्यासाठी रोज दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या संख्येवर मर्यादा येणार आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी रोज ७० ते ८० हजार भाविक येत असतात आता मात्र काही दिवस दीड ते दोन हजार भाविकांची दर्शन व्यवस्था करणेच मंदिर प्रशासनाला शक्य होणार आहे. याचसोबत सुरुवातीला काही दिवस विठुरायाचे दुरून दर्शन घ्यावे लागणार असून याबाबत राज्य सरकारच्या सूचना मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे पुदलवाड यांनी सांगितले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times