भोपाळ: भारतीय जनता पक्षाचे (BJP) दिग्गज नेते, माजी खासदार आणि कॅबिनेट मंत्री विश्वास सारंग (Vshwas Sarang) यांचे वडील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते कैलाश नारायण सारंग (Kailash Narayan Sarang) यांचे शनिवारी निधन झाले. ते बर्‍याच दिवसांपासून आजारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील रुग्णालयात दाखल केले. उद्या सकाळी त्यांचे पार्थिव मुंबईहून भोपाळ येथे आणले जाणार आहे.

सारंग यांच्या अंत्यसंस्काराबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. कैलाश सारंग गेल्या दीड महिन्यापासून रुग्णालयात दाखल होते. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांना प्रेमाने बाबूजी म्हणत असत. यांनी त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. कैलाश सारंग यांनी मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाला मजबूत करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. ते नेहमीच एक दयाळू आणि मेहनती नेते म्हणून आठवणीत राहतील. त्यांच्या निधनाने मी दु:खी आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे कुटुंबीय आणि शुभचिंतकांप्रती सहवेदना प्रकट केल्या आहेत.

त्यांच्या निधनानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. कैलाश सारंग यांच्या रुपाने जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाचा अतिशय मोटा आधार आम्ही गमावला असल्याचे शिवराजसिंह चौहान म्हणाले. व्यक्तिगतरित्या नेहमीच त्यांनी मला मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या जाण्याने मध्य प्रदेशातील राजकारणात विशाल पोकळी निर्माण झाली आहे. ती कधीही भरून निघणार नाही, असे शिवराजसिंह चौहान म्हणाले.

भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील कैलाश सारंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here