वाचा:
बाहेरील धार्मिक स्थळे उघडण्यासच तूर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यात ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षांखालील लहान मुलांना प्रार्थनास्थळांमध्ये घेऊन जाऊ नये, अशी प्रमुख सूचना करण्यात आली आहे. त्याशिवास करोनाच्या अनुषंगाने अन्यही काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे धार्मिक स्थळांचं व्यवस्थापन पाहत असलेल्या कमिट्यांवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.
वाचा:
या आहेत महत्त्वाच्या गाइडलाइन्स…
– कंटेन्मेंट झोनमधील धार्मिक स्थळे तूर्त बंदच राहणार आहेत. कंटेन्मेंट झोनबाहेरील धार्मिक स्थळेच उघडण्यास परवानगी असेल.
– ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, तसेच १० वर्षांखालील लहान मुलांना प्रवेश धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश देण्याचे टाळावे.
– दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर राखणे बंधनकारक असेल.
– मूर्ती, पुतळे वा पवित्र धर्मग्रंथाला स्पर्श करण्याचे टाळावे.
– प्रसादाचे वाटप तसेच पवित्र जलाचे शिंपण टाळावे. ज्या ठिकाणि अन्नदान होते अशा ठिकाणी प्रामुख्याने सुरक्षित वावर राखला जाईल याची काळजी घ्यावी.
– परिसरात विषयी जनजागृती करणारे माहिती फलक लावावेत. मार्गदर्शक सूचनांची माहिती देणारी एखादी ऑडिओ कॅसेटही लावली जावी.
वाचा:
– प्रार्थनास्थळांमध्ये असलेली मोकळी जागा, व्हेंटिलेशनची उपलब्धता या सर्व गोष्टींचा अभ्यास करून किती गर्दी प्रार्थनास्थळांमध्ये असायला हवी याचे नियोजन केले जावे.
– अन्य ठिकाणी जशी तोंडावर मास्क, सॅनिटायझेशन, सुरक्षित वावर याप्रकारची काळजी घेतली जाते, तशीच काळजी येथेही घ्यावी व अन्य दक्षताही बाळगावी.
– प्रार्थनास्थळांमध्ये जाण्याआधी चप्पल, बूट आपापल्या गाडीमध्येच काढून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसा पर्याय नसल्यास प्रत्येकाने आपले, तसेच आपल्या कुटुंबीयांच्या चपला, बूट स्वतःहून वेगळ्या ठिकाणी ठेवता येईल, अशी व्यवस्था करावी.
– मंदिरांच्या बाहेर पार्किंगमध्ये गर्दी होणार नाही, परिसरातील इतर दुकाने, कॅफेटेरियामध्ये देखील सुरक्षित वावर राखला जाईल याची काळजी घ्यावी.
– प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाने हात आणि पाय स्वच्छ धुणे आवश्यक.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times