म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

सीरिअल किलर याला अटक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त जिन यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. फियालोह यांनी अनेक जटील गुन्हे उघडकीस आणले परंतु रामन राघव याला अटक केल्यानंतर त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आले होते.

फियालोह हे वांद्रे येथे कटुंबियांसह वास्तव्यास होते. शुक्रवारी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. वांद्रे येथील अँड्रूस चर्चमध्ये शनिवारी फियालोह यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. फियालोह यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. १९६८ मध्ये डोंगरी पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक असताना दक्षिण मुंबईतील परिसरातून फियालोह यांनी रामन राघव याच्या मुसक्या आवळल्या. १९६६ ते ६८ या दोन वर्षांच्या कालावधीत रामन राघव याने मुंबईत धुमाकूळ घातला होता. बेघर, रस्त्याकडेला झोपड्यांमध्ये झोपलेल्या सुमारे ४१ निष्पाप लोकांचे रामन राघव याने बळी घेतले. लोखंडी रॉड, दगड यांसारख्या वस्तूंचा वापर करून रामन राघव याने हत्यासत्र सुरू ठेवले होते. विशेष म्हणजे अनेक पथके तयार करण्यात आली तरी रामन राघव काही कुणाच्या हाताला लागत नव्हता. उपनिरीक्षक असताना फियालोह यांनी रामन राघव याला शोधून काढल्याने ते चर्चेत आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here