पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवान याचा पार्थिव रविवारी त्याच्या या गावात येणार आहे. तेथे शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, दिवाळीतच झालेल्या या दुर्घटनेमुळे गावात कोणीही दिवाळी साजरी केली नाही.
चार महिन्यापूर्वी जम्मू काश्मीर येथे लष्करात सुरू झालेल्या जोंधळे याच्यावर पाकिस्तानच्या लष्कराने भ्याड हल्ला केला त्यामध्ये त्याला वीर मरण आले होते काल ही बातमी जिल्ह्यात वस्ताद जिल्ह्यावर शोककळा पसरली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले.
श्री. मुश्रीफ घरी पोहोचताच ऋषिकेश यांचे वडील रामचंद्र व आई सौ. कविता यांनी ‘साहेब, गेला तो परत आलाच नाही. आमचा एकुलता एक वाघ गेला हो…….’ असा आर्त हंबरडा फोडताच श्री. मुश्रीफ यांचे डोळे पाणावले आणि ते गहिवरले.
तीन लाखांचे अर्थसहाय्य
सामाजिक बांधिलकीतून नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने त्यांनी या कुटुंबासाठी तीन लाख रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर केले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times