नवी दिल्ली : ” आणि ” विजेते प्रसिद्ध बंगाली अभिनेते यांची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. कोलकाताच्या एका खासगी रुग्णालयात सौमित्र चटर्जी यांच्यावर उपचार सुरू आहेत.

८५ वर्षीय अभिनेते चटर्जी यांच्यावर बुधवारी ट्रोकोस्टॉमी आणि गुरुवारी प्लास्मफेरेसिस करण्यात आली होती. सत्यजीत रे यांच्या ‘अपुर संसार’ या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात करणारे सौमित्र चटर्जी करोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ते करोना निगेटिव्ह झाले. परंतु, या आजारानं त्यांना पुरतं बेजार करून सोडलं. त्यामुळे त्यांना अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यांना ऑक्सिजनची समस्या जाणवू लागली तसंच मूत्रपिंडही व्यवस्थित काम करत नव्हतं. त्यामुळे त्यांची प्रकृती आणखीनच खालावली.

सौमित्र यांची प्रकृती सुधारण्यासाठी डॉक्टरांकडून शेवटचे हरएक प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमकडून शनिवारी देण्यात आली.

सौमित्र चटर्जी यांनी लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलंय. उपचारांना त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळणं, ही चिंतादायक बाब आहे.

वाचा : वाचा :

‘आमच्या सर्व प्रयत्नांनंतरही सौमित्र यांच्याकडून उपचारांना कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळत नाही. त्यांची प्रकृती अगोदरपेक्षा जास्त बिघडलेली दिसतेय. त्यामुळे त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टमवर हलवण्यात आलं. इथं ते मृत्यूशी झुंज देत आहेत’, असं डॉक्टरांनी म्हटलंय.

पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, करोना संक्रमणामुळे चटर्जी यांचं शरीर निष्क्रीय पडंय. अनेक प्रयत्न करूनही त्यांच्यावर परिणाम दिसून येत नाही. आम्ही स्टेरॉईड, इम्युनोग्लोबुलिन, कार्डिओलॉजी, अँटी-व्हायरल थेरपी, इम्युनोलॉजी असे अनेक प्रयत्न करून पाहिले… परंतु, निष्फळ… न्युरोलॉजी, नेफ्रोलॉजी, कार्डिओलॉजी, क्रिटिकल केअर मेडिसीन अशा तज्त्रांच्या एका मोठ्या टीमनं गेल्या ४० दिवसापासून सौमित्र चटर्जी यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला.

‘आम्हाला खेद आहे की ते कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत. आमचे शेवटचे प्रयत्न सुरू आहेत. आता चटर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा होणार नाही हे कुटुंबानंही हे मान्य केलंय’ असं डॉक्टरांनी म्हटलंय.

सौमित्र चटर्जी यांना चित्रपटसृष्टीतील आपल्या योगदानासाठी २००४ साली पद्मभूषण तर २०१२ साली दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here