संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते यांची औपचारिकरित्या नेता म्हणून निवड करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) आमदांची संयुक्त बैठक रविवारी दुपारी १२.३० वाजता होणार आहे. नितीशकुमार यांच्या निवासस्थानी शुक्रवारी ‘जेडीयू’, , हिंदुस्थानी अवाम मोर्चा (हम) आणि विकासशील इन्सान पक्ष (व्हीआयपी) या घटकपक्षांच्या अनौपचारिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बिहार विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’तील घटकपक्षांपैकी भाजपने सर्वाधिक ७४ जागा जिंकल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनीही नितीश यांनाच मुख्यमंत्री बनविण्यावर भर दिला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच भाजपकडून नितीश हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचे जाहीर केले होते.
वाचा : वाचा :
दरम्यान, नितीशकुमार यांनी निवासस्थानी झालेल्या बैठकीतील माहिती दिली नाही. सूत्रांनी सांगितले, की मंत्रिमंडळात सर्व घटकांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्याबाबत आणि विधानसभेच्या अध्यक्षनिवडीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच, भाजपकडून अतिमागास जातीतील किंवा अनुसूचित जातीतील एकास उपमुख्यमंत्रिपद देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे; परंतु, त्यास दुजोरा मिळाला नाही.
नितीश यांचा राजीनामा
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवे सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रथेनुसार मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे निथीस यांनी राजीनामा सुपूर्द केला. राज्य विधानसभा विसर्जित करण्याची शिफारसही नितीश यांनी राज्यपालांना केली. राज्यपालांनी नितीश यांचा राजीनामा मंजूर केला आहे. ‘एनडीए’चे नवे सरकार पदभार स्वीकारेपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची सूचना राज्यपालांनी नितीश यांना केली आहे.
वाचा : वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times