म. टा. प्रतिनिधी, मुंबई

भारतीय उपखंडाशी संबंधित व्यापारी व तेलवाहू जहाजांना समुद्री चाच्यांपासून संरक्षण देण्याचे काम नौदलाकडून अरबी समुद्रात आफ्रिकेपर्यंत केले जात आहे. परंतु नायजेरियाच्या समुद्री चाच्यांनी नौदलाच्या नजरेआड व्यापारी जहाज व २० खलाशांचे काही दिवसांपूर्वी केले. त्यापैकी बहुतांश खलाशी गोवा आणि मुंबईतील असून यातील गोव्यातील खलाशाचा मृत्यू झाला आहे. उर्वरित खलाशांची सुटका करण्यात आली आहे.

भारतासह उपखंड तसेच दक्षिण-पूर्व आशियातील देशांचा समुद्री व्यापार आफ्रिकी समुद्रातून होतो. या भागांत नायजेरिया, सोमालिया, मादागास्कर येथील समुद्री चाच्यांचा वावर असतो. हे चाचे कायम व्यापारी जहाजांना लक्ष्य करतात. यामुळेच त्यांच्या सुरक्षेसाठी नौदलाच्या पश्चिम कमांड अंतर्गत एक विनाशिका व एक यश फ्रिगेट श्रेणीतील युद्धनौका कायम तैनात असते. अमेरिका-इराण यांच्यातील अलीकडच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नौदलाने आणखी एक विनाशिका टेहळणी हेलिकॉप्टरसह आफ्रिकेच्या समुद्रात धाडली. तसे असतानाही आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टी भागात नायजेरियन चाच्यांनी भारताच्या दिशेने येणाऱ्या एका जहाजाचे अपहरण केले.

मुंबईतील एका कंपनीच्या अखत्यारीतील ‘ड्यूक’ हे व्यापारी जहाज काही दिवसांपूर्वी लंडनहून भारताकडे येत होते. त्यावेळी टोगो व नायजेरियाजवळील समुद्रात चाच्यांनी त्यावर हल्ला चढवून जहाजासह त्यातील २० केले. हे खलाशी गोवा व मुंबई येथील होते. बंदिवानात असतानाच गोव्याच्या ब्रिट्टो डी सिल्व्हा या खलाशाचा तणावामुळे मृत्यू झाला. टोगो तटरक्षक दलाने या घटनेची माहिती भारतीय नौदल व संबंधितांना दिली. त्यानंतर विविध स्तरावर प्रयत्न करण्यात आले. अखेर रविवारी सायंकाळी उर्वरित खलाशांची चाच्यांनी सुटका केली. त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. गोवा सरकारच्या अनिवासी भारतीय संचालनालयानेही यासाठी तातडीची पावले उचलली आहेत.

समन्वय असूनही…

ज्या भागात ही घटना घडली त्या भागात नौदलाची आयएनएस तर्कश ही युद्धनौका मागील महिन्यात गेली होती. व्यापारी जहाजांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नौदलाकडून आफ्रिकी किनारपट्टीवरील देशांशी सातत्याने समन्वय साधला जातो. तसे असतानाही ही घटना घडल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here