मुंबई: ‘सुख किंवा दुःख देणारे दुसरे कोणी नसते. इतर कोणामुळे तरी आपल्यावर दुःख कोसळले असे समजणे चुकीचे आहे. ‘अमके तमके मी करीन’ हा अहंकार, अभिमानही फालतू आहे. तुमचे कर्मच तुम्हाला तळोजाच्या तुरुंगात घेऊन जाते,’ असा खोचक टोला शिवसेनेचे नेते, खासदार यांनी रिपब्लिक टीव्हीचे मालक, संपादक यांना हाणला आहे.

शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ”तील रोखठोक सदरात राऊत यांनी दिवाळीची महती सांगताना वर्तमान परिस्थितीवर बोट ठेवलं आहे. त्यातून त्यांनी केंद्र सरकार व अर्णव गोस्वामी यांना अप्रत्यक्ष टोले हाणले आहेत. ‘प्रभू राम हे विजय प्राप्त करून अयोध्येत आले तेव्हा लोकांनी आनंदाचा उत्सव साजरा केला. तो उत्सव म्हणजे दिवाळी. आता अयोध्येत राममंदिराचं भूमिपूजन झालं आहे. बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच ‘जय श्रीराम’चे नारे दिले, पण रामाचे राज्य येऊनही करोनाचा रावण मारला जात नाही,’ असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.

वाचा:

‘ज्ञान, बुद्धी, विचार कमवावे लागतात. हे कमवणे आता कमी झाले आहे. एका वृत्तवाहिनीचा प्रमुख गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्याबद्दल तुरुंगात गेला. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे तो सुटून तुरुंगातून बाहेर पडला तेव्हा ‘भारतमाता की जय’ वगैरे घोषणा देऊ लागला. येथे भारतमातेचा काय संबंध? ज्या न्यायमूर्ती महाशयांनी व्यक्तिस्वातंत्र्याच्या सबबीखाली त्याची सुटका केली, त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा देणे हे समजण्यासारखे आहे. येथे भारतमाता, राष्ट्रभक्ती वगैरेचा संबंध काय?,’ असा प्रश्नही राऊत यांनी केला आहे.

वाचा:

‘ज्या तरुण उद्योजकाने छळास कंटाळून आत्महत्या केली, ते अन्वय नाईक हेही भारतमातेला मानत होते. अन्वय नाईक यांच्या पत्नीही मानतात. भारतमातेचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा उत्सव फक्त एका व्यक्तीपुरता नसतो,’ असंही त्यांनी म्हटलं आहे. ‘दिवाळी म्हणजे तेजपर्वाची सुरुवात. श्रीरामाच्या वनवास समाप्तीने, अयोध्येतील आगमनाने या पर्वाची सुरुवात झाली. देश आज अंधारलेला आहे. नवे तेजपर्व सुरू होईल,’ अशी अपेक्षा बाळगायला काय हरकत आहे,’ असंही राऊत यांनी शेवटी म्हटलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here