जगभरात करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मास्क विकसित करण्यात आलेत. त्यापैकी एन-९५ या मास्कचा सर्वाधिक वापर सध्या केल्या जात आहे. आता संशोधकांनी सुती कापडाचे असे मास्क विकसित केले आहे, जे उन्हात वाळविल्यानंतर विषाणू स्वत: नष्ट करू शकेल. या मास्कमधील विशेष बनावट प्रतिक्रियाशिल ऑक्सिजन स्पायजेस तयार करतो. त्यातून विषाणू नष्ट होतात. या मास्कची बनावट अशाप्रकारे करण्यात आली आहे की उन्हाची तीव्र किरणे मास्कच्या कानाकोपऱ्यात पोहचतील. इतकेच नव्हे तर खोकलताना किंवा शिंकताना या मास्कने विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे. यासंदर्भातील माहिती एसीएस अॅप्लाइड मटेरियल अॅण्ड इंटरफेसेज या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.
वाचा:
सुती कापडाबद्दल आम्ही ठाम होतो. त्याचा वापर केल्याने अनेक फायदे होतात याबद्दल आम्ही ठाम होतो. त्यामुळे आम्ही सुती कापडाची निवड केल्याने संशोधन करणाऱ्या चमुतील तज्ज्ञांनी सांगितले. मास्क तयार करताना आरओएस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हे मास्क स्वच्छ धुतल्यानंतर उन्हात वाळविता येणे शक्य आहे. उन्हात वाळविताना मास्क स्वत:हूनच विषाणूचा खातमा करेल, असे तज्ज्ञांनी सांगितले.
वाचा:
वाचा:
बंगाल डायचा वापर
सुती कपड्याचे मास्क तयार करण्यासाठी बंगाल डाय कपड्याचा वापर करण्यात आला आहे. या कपड्यात फोटो सॅनीटायजर प्रणालीचा वापर शक्य होत आहे. सुमारे एक तासभर या कपड्याला उन्हात वाळविले तर त्यातील विषाणू जवळपास पूर्णपणे नष्ट होत असल्याचे संशोधनात आढळले. सुमारे ३० मिनिटांत कपड्यातील टी-सेव्हन बॅक्टेरियाफेज पूर्णपणे सक्रिय होऊन जातात. त्यामुळे करोनाच्या विषाणूशी लढताना या मास्कचा वापर होऊ शकतो असा विश्वास संशोधकर्त्यांनी वर्तविला आहे.
वाचा:
दरम्यान,
विषाणूंचा मानवी शरीरावर किती प्रभाव राहतो, यावर अमेरिकेत संशोधन करण्यात आले आहे. करोना विषाणूचा मानवी शरीरावर दीर्घकाळ प्रभाव राहत असल्याचे समोर आले आहे. करोनाबाधितांवर करण्यात आलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. या संशोधनात अमेरिकेतील १६०० हून अधिक करोनाबाधितांचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांनी, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर जवळपास ६० दिवसांनंतर ४८८ रुग्णांसोबत चर्चा केली. त्यातील ३९ टक्के जणांनी रुग्णांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही दोन महिन्यानंतरही पूर्वीसारखी सामान्य हालचाल, धावपळ करू शकत नसल्याचे सांगितले. हे संशोधन ‘एनल्स ऑफ इंटर्नल मेडिसिन’मध्ये प्रकाशित झाले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times