मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल अमेरिकेचे माजी अध्यक्ष यांनी केलेल्या टिप्पणीवरून भारतात राजकारण रंगलं आहे. ओबामा यांच्या वक्तव्याचा आधार घेत भाजपच्या नेत्यांनी राहुल यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. शिवसेनेचे खासदार यांनी मात्र राहुल गांधी यांची पाठराखण केली होती. त्यावरून माजी खासदार यांनी राऊतांना टोला हाणला आहे. ‘आता ओबामांचं काही खरं नाही,’ असं खोचक ट्वीट नीलेश राणे यांनी केलं आहे.

बराक ओबामा यांचं ‘अ प्रॉमिस्ड लँड’ नावाचं पुस्तक नुकतंच बाजारात आलं आहे. त्यात त्यांनी राहुल गांधी हे कमी योग्यतेचे नेते असल्याचं म्हटलं आहे. ओबामांच्या या वक्तव्याचा फायदा भाजपचे नेते उठवत असले तरी संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची पाठराखण केली होती. ओबामांच्या वक्तव्याबद्दल नाराजीही व्यक्त केली होती. ‘ओबामा यांना भारतीय नेत्यांविषयी बोलण्याचा अधिकार कोणी दिला? विदेशी नेते भारतीय राजकारण्यांबद्दल अशी मत मांडू शकत नाहीत. त्यावरून भारतात सुरू असलेलं राजकारणही अयोग्य आहे. ट्रम्प वेडे आहेत असं आम्ही कधी म्हणणार नाही. मुळात ओबामांना भारताबद्दल किती माहिती आहे, असं राऊत म्हणाले होते.

राऊत यांच्या या नाराजीवर नीलेश राणे यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ‘ हा एका राज्याचा जागतिक पक्ष नाराज झाल्यामुळं बराक ओबामाला झोप लागत नसेल. आता ओबामाचं कसं होणार या चिंतेमध्ये त्यांचा डेमोक्रॅट पक्ष संयुक्त राष्ट्रसंघाकडे (UNO) धाव घेण्याच्या विचारात असावा. ओबामाचं आता काही खरं नाही,’ असं नीलेश राणे यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here