जळगाव: भाजपला धक्का देत नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले यांच्या कन्या यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर जळगावमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ( tests corona positive)
रोहिणी खडसे यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ‘माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. प्रकृती उत्तम आहे. मात्र, खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होत आहे. गेल्या सहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना चाचणी करून घ्यावी व स्वत:ची काळजी घ्यावी,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे.
रोहिणी खडसे या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आहेत. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातही त्या सक्रिय आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर त्या निवडणूक रिंगणात होत्या. मात्र, शिवसेनेच्या उमेदवाराकडून त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला होता. एकनाथ खडसे यांच्यासोबत अलीकडंच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
आणखी वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times