पाटणा : बिहारमध्ये सत्तारुढ एनडीएची रविवारी आज पार पडलेल्या बैठकीत नितीशकुमार यांनाच सर्वसंमतीनं एनडीए दलाचं नेता म्हणून निवडण्यात आलंय. यामुळे, हेच बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा शपथ घेणार, यावर आता शिक्कामोर्तब झालंय. भाजपचे हे बिहारच्या पदावर आरुढ होणार आहेत. शपथग्रहण सोहळा सोमवारी पार पडू शकतो. (Bihar CM and Deputy CM )

संरक्षण मंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित

पाटण्यात नितीश कुमार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. आज झालेल्या एनडीएच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेदेखील उपस्थित होते. या बैठकीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होण्यासाठी दाखल झाले असता खुद्द नितीश कुमार यांनी आपल्या निवासस्थानाच्या बाहेर येऊन त्यांचं अगत्याने स्वागत केलं.

वाचा : वाचा :

एनडीएत भाजपकडे (BJP) सर्वाधिक म्हणजेच ७४ आमदार आहेत. तर जनता जल युनायटेड (JDU)कडे ४३ आमदार आहेत. सहकारी पक्ष असलेल्या हम आणि व्हीआयपी यांच्याकडे प्रत्येकी ४-४ जागा आहेत.

नितीश कुमार यांची निर्विवाद एनडीएच्या नेते पदी निवड झाल्यानंतर हे सगळे नेते राजभवनाकडे रवाना झाले. इथे त्यांनी राज्यपाल फागू चौहान यांच्यासमोर नवं सरकार गठनाचा दावा केला. राज्यपालांनीही नितीश कुमार यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलंय.

मंत्रिमंडळात भाजप किंवा जेडीयू यांच्यापैंकी कोणत्या नेत्यांचं वर्चस्व राहील, हेदेखील पाहणं उत्सुकतेचं ठरतंय. लवकरच मंत्रिमंडळाची स्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here