राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठीच्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) चुकांची परंपरा कायम असून, प्रश्नपत्रिकेत शुद्धलेखनासह अन्य तांत्रिक चुका असल्याचे आढळून आले आहे. राज्यातील १०४४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा रविवारी झाली. या परीक्षेला एकूण नोंदणी केलेल्या केलेल्यांपैकी ९० टक्के परीक्षार्थ्यांनी हजेरी लावली होती. या ३० प्रश्नांमध्ये ११०हून अधिक चुका आढळून आल्या आहेत.
गेल्या दीड वर्षात राज्यात टीईटी परीक्षा झाली नव्हती. त्यामुळे यंदा टीईटी परीक्षेसाठी तीन लाख ४३ हजार २८३ परीक्षार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा केंद्रांवर कोणताही गोंधळ न होता ही परीक्षा पार पडली. मात्र, प्रश्नपत्रिकेत शुद्धलेखनाच्या चुकांसह अन्य तांत्रिक चुका असल्याचे यंदाही आढळून आले. प्रश्नांमध्ये शुद्धलेखन तसेच छापील चुका होत्या, अशी माहिती परीक्षार्थींनी दिली. चुका असणारे प्रश्न सोडविण्याच्या घाई-गडबडीत काही परीक्षार्थींची उत्तरे चुकली. त्यामुळे प्रश्नपत्रिकेतील छापील चुकांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन सत्रांत झालेल्या परीक्षेतील काठीण्य पातळी अधिक होती. तर, प्रश्नपत्रिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्याचे परीक्षार्थींनी सोमवारी परिषदेला कळविले आहे. त्यावरून परिषदेवर सोशल मीडियावरूनही लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, याबाबत परीक्षा परिषदेचे तुकाराम सुपे यांनी ‘मटा’ला सांगितले की, प्रश्नपत्रिकानिहाय चुका काढण्याचे काम सुरू आहे. झालेल्या चुकांच्या संदर्भातील अहवाल कमिटीसमोर ठेवून त्या प्रश्नांची गुण विद्यार्थ्यांना द्यायचे की, काय याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
पर्याय चुकीचे, प्रश्नही चुकीचे
परीक्षार्थींच्या म्हणण्यानुसार पेपर-२मधील बालमानसशास्त्र विषयाचे प्रश्न पाहिले तर, केवळ ३० प्रश्नांत व्याकरणाच्या ११०हून अधिक चुका आहेत. पेपर १ व २मधील इतर प्रश्नांमध्येही असंख्य चुका आहेत. काही प्रश्नांना पर्याय चुकीचे तर, काही प्रश्नच चुकीचे आहेत. प्रश्न न देता फक्त पर्यायच दिलेले होते. आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Thank you for great article. Hello Administ . Onwin engelsiz giriş adresi ile 7/24 siteye butonlarımızla erişim sağlayabilir ve Onwin üyelik işlemini 3 dakika da halledebilirsiniz. onwin , onwin giriş , onwin güncel giriş , onwin