मुंबई: ” या मालिकेतील ‘जिजी’ म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री यांचं शनिवारी निधन झालं. त्यांच्या अचानक निघून जाण्यानं मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त करत जिजीसोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

‘जिजे अजून खूप त्रास द्यायचा होता ग तुला,मला काय बोलली होतीस की, प्रत्येक ठिकाणी मीच तुझी आज्जी असणा आहे आणि तूच माझा नातू ,आपल्या दोघांना एकत्र खूप काम करायचं होतं ना मग का ग इतक्यात सोडून गेलीस’, असं मालिकेतील अज्या म्हणजेच यानं म्हटलं आहे. त्यानं मालिकेतल्या एका गोड प्रसंगाचा व्हिडिओ शेअर केलाय.

जिजे..जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुझी आठवण येत राहील गं. .भावपूर्ण श्रद्धांजली, असं शितली म्हणजेच अभिनेत्री हिनं लिहिलं आहे.

तसंच अभिनेता यानं देखील कमल ठोके यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.’खुप मोठी पोकळी केलीस’, असं म्हणत त्यानं त्याच्या भावना व्यक्त केल्यात.

कर्करोगावर सुरू होते उपचार
यांचं शनिवारी सायंकाळी निधन झालं. त्या ७४ वर्षांच्या होत्या. कर्करोगानं त्रस्त असलेल्या कमल ठोके यांच्यावर बेंगळुरू इथं उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला.

३३ वर्षे शिक्षिकेची नोकरी
कमल ठोके या मूळच्या शिक्षक. तब्बल ३३ वर्षे त्यांनी शिक्षिकेची नोकरी केली. २००५ साली मुख्याध्यापिका म्हणून त्या निवृत्त झाल्या होत्या.
जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कारही त्यांनी मिळवला होता. शिक्षकी पेशा सांभाळत त्यांनी आपली अभिनयाची आवड जोपासली. राज्य नाट्य स्पर्धांमध्येही त्यांनी भाग घेतला होता. १९९२ साली त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. मात्र, शिक्षकाची नोकरी सांभाळून अभिनयाची आवड जोपासण्यास मर्यादा होत्या. सेवानिवृत्त झाल्यानंतर मात्र त्यांनी अभिनयावर लक्ष केंद्रित केले. छोट्या पडद्यावर येण्याआधी त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. बाबा लगीन, बरड, माहेरचा आहेर, सख्खा भाऊ पक्का वैरी, आम्ही असू लाडके, नामदार मुख्यमंत्री गावडे, सासर माहेर, कुंकू झालं वैरी, भरला मळवट अशा अनेक चित्रपटांत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. सध्या त्या ‘देवमाणूस’ मालिकेत काम करत होत्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here