नितीशकुमार हे पूर्वी एनडीए आघाडीचे मोठे नेते आणि मुख्यमंत्री होते. पण यावेळी भाजप त्यांना आपल्या रिमोट कंट्रोलवर चालणारा मुख्यमंत्री बनवत आहे, असं अन्वर म्हणाले. दरम्यान, बिहारमध्ये नितीशकुमार यांची एनडीएने विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे. एनडीए विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नितीशकुमार हे आमदारांसह राज्यपालांना भेटले आणि सरकार स्थापनेचा दावा केला. नितीशकुमार हे सातव्यांदा म्हणून उद्या शपथ घेतील.
तारिक अन्वर यांच्या कॉंग्रेस पक्षाने महाआघाडी अंतर्गत बिहारमध्ये एकूण ७० जागा लढवल्या. पण फक्त १९ जागांवर काँग्रेसला विजय मिळाला. जागावाटपातील दिरंगाईमुळे आवश्यक तेवढा प्रचार करता आला आहे, हे पराभवाचं कारण असल्याचं तारिक अन्वर या आधी म्हटले होते. तसंच बिहारमध्ये सत्ता बदलाची लाट आली. पण ही संधी आम्हाला मिळवता आली नाही, असं तारिक अन्वर यांनी स्पष्ट केलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times