मुंबई : प्रदुषण करू नका आणि त्यामुळेच दिवाळीमध्ये फटाके फोडू नका, असे आवाहान भारताचा कर्णधार विराट कोहलीने ट्विटरच्या माध्यमातून सर्वांना केले होते. पण आता कोहलीचाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये कोहलीला फटाके किती आवडतात हे दिसत आहे. त्यामुळे चाहते आता कोहलीला चांगलेच ट्रोल करत असून त्याची ट्विटरवर चांगलीच शाळा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

विराट कोहलीने दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये कोहली म्हणाला होता की, ” आपण सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण करायला हवे. त्यामुळे यावर्षी दिवाळीमध्ये तुम्ही फटाके फोडू नका. त्याचबरोबर दिवाळी घरी दिवे लावून साजरी करा. आपल्या जवळच्या व्यक्तींना मिठाई देऊन त्यांचे तोंड गोड करा.” पण यानंतर कोहली चांगलाच ट्रोल व्हायला लागला. आता तर कोहलीला फटाके किती आवडतात, याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला आहे.

कोहलीचा हा व्हिडीओ त्याच्या वाढदिवसाचा आहे. कोहलीचा या वर्षीचा वाढदिवस युएईमध्ये साजरा करण्यात आला. कोहलीचा नोव्हेंबरला वाढदिवस होता आणि आरसीबीच्या संघाबरोबर त्याने सेलिब्रेशन केले होते. यावेळी जेव्हा विराट पत्नी अनुष्काबरोबर केक कापत होता तेव्हा त्याच्या मागे फटाके फोडले जात होते. त्यानंतर या व्हिडीओमध्ये कोहलीला ही फटाक्यांची अतिषबाजी चांगलीच पसंत पडत असल्याचेही पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच चाहत्यांना आता कोहलीला चांगलेच ट्रोल केले आहे.

यावेळी चाहत्यांनी कोहलीला ट्रोल करताना म्हटले आहे की, ” आम्ही तुझ्या खेळाचे चाहते आहोत, पण याचा अर्थ हा होत नाही की, तु आम्हाला काही सल्ले द्यावेत. जेव्हा आयपीएलच्या विजेतेपदाची ट्रॉफी दिली जाते तेव्हाही फटाके फोडले जातात, तेव्हा पर्यावरण आणि प्रदुषणाचा मुद्दा ऐरणीवर येत नाही का? आयपीएलमध्ये होणाऱ्या फटक्यांच्या अतिषबाजीमुळेच कोहलीने आतापर्यंत जेतेपद पटकावलेले नाही.”

लोकांना फटाके फोडू नका, त्यामुळे प्रदुषण होते, असा सल्ला कोहली द्यायला गेला होता. पण यामुळे आता कोहलीच चांगला ट्रोल होताना दिसत आहे. आपल्या सेलिब्रेशनला फटाके चालतात, पण मग दुसऱ्यांनी का फटाके फोडू नये, असा सवालही आता चाहते कोहलीला विचारु लागले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here