नवी दिल्लीः बिहारमधील ( ) राजकीय पारा पुन्हा चढू लागला आहे. आधी एनडीएमध्ये सुशील मोदींचं उपमुख्यमंत्रीपद गेलं. आता राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) ज्येष्ठ नेते ( ) यांनी कॉंग्रेसवर हल्ला चढवला आहे. राहुल गांधींच्या ( ) कार्यशैलीमुळे भाजपला मदत मिळतेय, असा गंभीर आरोप शिवानंद तिवारी यांनी केला.

कॉंग्रेस पक्ष महाआघाडीसाठी अडथळा बनला आहे. कॉंग्रेसने ७० उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. पण ७० सभाही घेतल्या नाहीत. राहुल गांधी बिहारमध्ये फक्त तीन दिवसांसाठी आले. प्रियांका गांधी तर आल्याच नाहीत. कारण बिहारशी त्यांचा फारसा परिचय नाही, असं शिवानंद तिवारी म्हणाले.

बिहारमध्ये निवडणूक रंगात आली असताना आणि प्रचार शिगेला पोहोचला असताना राहुल गांधी शिमलामधील प्रियांका गांधींच्या घरी पिकनिक करत होते. अशाप्रकारे पक्ष चालतो का? कॉंग्रेस पक्ष ज्या पद्धतीने चालवला जात आहे, त्याचा पूर्ण फायदा भाजपला होत आहे, असं म्हणत शिवानंद तिवारी यांनी काँग्रेसला सुनावलं.

राहुल गांधी यांच्या घरी बैठक झाली होती. या बैठकीत कपिल सिब्बल, शशी थरूर, मुकुल वासनिक, मनीष तिवारी हे सर्व वरिष्ठ नेते बसले होते. प्रत्येकाने पत्र लिहिलं. हे सर्व आयुष्यभर कॉंग्रेसचे निष्ठावान नेते. पण अशाप्रकारे पक्ष चालवू शकत नाही. असा पक्ष चालवतात का? कॉंग्रेसचा ज्या प्रकारे कारभार सुरू आहे त्याचा फायदा भाजपाला होत आहे, असं तिवारी म्हणाले.

फक्त बिहारमध्येच काँग्रेसची अशी स्थिती नाहीए. तर इतर राज्यातही जास्तीत जास्त जागा लढवण्याचा कॉंग्रेसचा आग्रह असतो. पण निवडणूक जिंकण्यात मात्र ते अपयशी ठरत आहेत. असं का होतंय? याचा विचार कॉंग्रेसने करायला हवा, असं आवाहनही तिवारींनी केलं.

दुसरीकडे केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी व्हिडिओ शेअर केला. शिवानंद तिवारी हे अनुभवी नेते असल्याचं ते म्हणाले. किरण रिजिजू यांनी यासंदर्भात ट्विट केलं. ‘शिवानंद तिवारी हे एक अतिशय अनुभवी आणि वरिष्ठ राजकीय नेते आणि आरजेडीचे ज्येष्ठ नेते आहेत’, असं रिजीजू म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here