म. टा. विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख यांचा २३ जानेवारीला मुंबईतील गोरेगावमध्ये मेळावा घेणार असून राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्व, समान नागरी कायदा याबाबत राज ठाकरे काय भूमिका मांडणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

मनसेने गुरूवारच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. मेळाव्याआधी मनसेकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये तसेच, रस्त्यांवर लावण्यात आलेल्या होर्डिंग्जमध्ये मनसेच्या नेहमीच्या झेंड्याऐवजी भगव्या झेंड्याचा समावेश असल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा मेळावा होत असल्याने त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यात स्थापन झालेल्या नव्या सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचा समावेश आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केल्याने शिवसेना त्यांच्या जहाल हिंदुत्वाच्या मुद्याचे नेमके काय करणार, असा सवाल त्यांना विचारला जात आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत गेलेल्या शिवसेनेच्या वाट्याला केवळ दहाच कॅबिनेट मंत्रिपदे आली आहेत. त्यातही तीन मंत्रिपदे अपक्षांना देण्यात आल्याने पक्षातील नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

वाचा:

वाचा:

काँग्रेस आघाडीसोबत सत्ताप्राप्ति केल्याने शिवसेनेला हिंदुत्व आणि आक्रमक भूमिका बाजूला ठेवावी लागते की काय, अशी चर्चा शिवसेना नेतेच खासगीत करू लागले आहेत. या वातावरणात हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मनसे आक्रमक होणार असेल तर मूळचे आक्रमक शिवसैनिक नवा पर्याय चाचपतील काय, अशी भीती शिवसेनेचे नेते खासगीत व्यक्त करीत आहेत. राज ठाकरे समान नागरी कायद्याविषयी भूमिका मांडणार असल्याचे कळते. या कायद्याच्या बाजूने त्यांनी भूमिका मांडल्यास भाजपला मदत होईल, तर काँग्रेसची डोकेदूखी वाढेल असेही बोलले जात आहे. समान नागरी कायद्याच्या भूमिकेसाठी राज ठाकरे सर्वसामान्यांना रस्त्यावर उतरविणार असतील तर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने नव्या सरकारला व्यूहरचना करावी लागेल. या मेळाव्यात राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांच्यावर पक्षाची नवी जवाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here