म. टा. प्रतिनिधी,

लॉकडाउनमुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली शहरातील सर्व प्रार्थनास्थळे पाडव्याला (सोमवारी) नागरिकांसाठी खुली होणार आहेत. त्यामुळे रविवारी या सर्व धार्मिकस्थळी दिवसभर विश्वस्त आणि स्वयंसेवकांची लगबग सुरू होती. सभामंडपांतील स्वच्छता, सॅनिटायझेशन आणि गर्दीच्या नियोजनाची पूर्ण तयारी प्रार्थनास्थळांवर करण्यात आली.

राज्य सरकारने शनिवारी दुपारी पाडव्यापासून सर्व खुली करण्यास परवानगी दिली. सर्व मंदिरांनी सरकारच्या या निर्णय़ाचे स्वागत केले. दिवाळीत पाडव्याला सकाळी देवदर्शनाला जाण्याची परंपरा पुणेकरांनी जपली आहे. मंदिराच्या पहिल्याच दिवशी खूप गर्दी होणार असल्याने याचे नियोजन करण्यासाठी मंदिर प्रमुख, विश्वस्तांनी रविवारी सकाळीच बैठक आयोजित केली होती. सरकारच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भातील नियोजन या वेळी करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात भाविकांना केवळ देवदर्शनाची व्यवस्था उपलब्ध केली आहे. त्यामुळे सभामंडपात बसून ध्यानधारणा, अभिषेकास सध्या परवानागी नाही. भाविकांसाठी मंदिराबाहेर सॅनिटायझरचीही सोय केली आहे. काही मंदिरांनी एका वेळी मंदिरात किती भाविकांना प्रवेश मिळेल, याचीही नियमावली केली आहे.

प्रसाद घेऊन न येण्याचे आवाहन

शहरातील बहुतांश उद्यापासून सुरू होणार आहेत; पण मास्कशिवाय भाविकांना प्रवेश मिळणार नाही. भाविकांनी येताना फुले, हार, नारळ आणि इतर कोणताही प्रसाद घेऊन मंदिरात येऊ नये; तसेच सभामंडपात रेंगाळू नये, असे आवाहन शहरातील प्रमुख मंदिरांनी केले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here