नागपूर येथील भूषण रमेश सतई आणि कोल्हापुरातील ऋषिकेश रामचंद्र जोंधळे या दोन जवानांना पाक सैन्याशी लढतान वीरमरण आले आहे. वीर जवान याचा पार्थिव रविवारी त्याच्या बहिरेवाडी गावात दाखल झाले आहे. तर, नागपुरात भूषण सतई याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील उपस्थित होते.
जोंधळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अलोट गर्दी जमली आहे. दिवाळीतच झालेल्या या दुर्घटनेमुळं गावात कोणीही दिवाळी साजरी केली नाहीये. ऋषिकेश हा ६ मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत होता. ११ जून रोजी त्याने ड्युटी जॉइन केली होती. राष्ट्रीय खेळाडू असल्याने त्या माध्यमातून त्याची भारतीय लष्करात भरती झाली होती. त्याला एक लहान बहीण असून ऋषिकेशच्या निधनाने दु:खाचा डोंगरच जोंधळे कुटुंबीयावर कोसळला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times