विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते यांनी बिहारच्या निमित्तानं महाराष्ट्रात वर्षभरापूर्वी घडलेल्या नाट्यमय घडामोडींना उजाळा देत शिवसेनेवर तोफ डागली आहे. ‘महाराष्ट्रात भाजपनं शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच नव्हता,’ असा दावा दरेकर यांनी केला आहे.
बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद देऊन भाजपनं शब्द पाळला आहे, असं भाजपचे नेते सांगत आहेत. ‘बिहारमध्ये भाजपनं आधीच जाहीर केल्यानुसार नितीश मुख्यमंत्री होत आहेत. दिलेला शब्द आम्ही पाळला आहे. महाराष्ट्रात असा कुठलाही शब्द आम्ही दिला नव्हता,’ असं दरेकर यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. ‘शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती हे खरं आहे. पण, भाजपनं तसा कोणताी शब्द दिला नव्हता, असं ते म्हणाले.
वाचा:
बिहारमध्ये भाजपच्या दोन आमदारांना उपमुख्यमंत्री म्हणून संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत विचारलं असता, ‘बिहार हे मोठं राज्य असल्यामुळं पक्षानं तसा निर्णय घेतला आहे. त्यामागे दुसरं कुठलंही कारण नाही. महिलांचे प्रश्न समजून घेता यावेत म्हणून महिलेला उपमुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं आहे,’ असं दरेकर यांनी स्पष्ट केलं.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times