नवी दिल्ली: भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरू होते. या दौऱ्याची सुरूवात तीन मॅचच्या वनडे मालिकापासून होणार आहे. या दोन्ही संघात गेल्या काही वर्षांपासूनच्या लढती चुरशीच्या झाल्या आहेत. भारतीय संघाने अनेकवेळा ऑस्ट्रेलियाच्या त्यांच्या भूमीत पराभूत करण्याची कामगिरी केली आहे. या वर्षी देखील अशीच चुरस पाहायला मिळू शकते.

वाचा-

युएईमध्ये आयपीएलचा १३वा हंगाम झाल्यानंतर ३० खेळाडू एकत्र ऑस्ट्रेलियात दाखल झाले. वनडे मालिकेतील पहिल्या दोन लढती २७ आणि २९ नोव्हेंबर रोजी सिडनी मैदानावर होणार आहे. तर तिसरी लढत ओव्हर मैदानावर होईल. वनडे मालिकेसाठी भारतीय संघाने युवा खेळाडूना संधी दिली आहे. वनडे मालिकेनंतर टी-२० मालिका होणार आहे. यात वरुण चक्रवर्तीच्या ऐवजी टी नटराजन याला संधी दिली आहे. चक्रवर्तीच्या खांद्याला दुखापत झाली आहे. जाणून घेऊयात दोन्ही संघातील वनडेतील रेकॉर्ड…

वाचा-

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत १४० लढती झाल्या आहेत. यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे. त्यांनी ७२ सामन्यात तर भारताने ५२ सामन्यात विजय मिळवला आहे. १० सामन्याचा निकाल लागला नाही. या शिवाय पाच सामने असे झाले की जे रद्द करावे लागले.

ऑस्ट्रेलिया भूमीवरतील रेकॉर्ड…

या दोन्ही संघातील ऑस्ट्रेलिया लढतीचा विचार केल्यास ९६ पैकी ५१ लढती ऑस्ट्रेलियाने तर ३९ लढती भारताने जिंकल्या आहेत. सहा सामन्याचा निकाल लागला नाही. गेल्या पाच लढतीचा विचार केल्यास भारताने दोन तर ऑस्ट्रेलियाने तीन जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलियात झालेल्या अखेरच्या पाच लढतीत भारताने ३ तर ऑस्ट्रेलियाने दोन जिंकल्या आहेत.

वाचा-

सचिन अव्वल स्थानी…

दोन्ही संघातील खेळाडूंचा विचार केल्यास सचिन तेंडुलकरने ७१ सामन्यात ३०७७ धावा केल्या आहेत. सचिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ शतक केली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. त्याने ४० लढतीत २ हजार २०८ धावा केल्या. भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ८ शतक केली आहेत. या वर्षी त्याला सचिनचा शतकांचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

गोलंदाजीत ब्रेट लीने ३२ सामन्यात ५५ विकेट घेतल्या आहेत. तर कपिल देव यांनी ४१ सामन्यात ४५ विकेट घेतल्या आहेत. भारताच्या सध्याच्या टीममधील रविंद्र जडेजाने ३३ सामन्यात २७ विकेट तर मोहम्मद शमीच्या नावावर २५ विकेट घेतल्या आहेत.

धावसंख्या

सर्वोच्च धावसंख्या: ५ बाद ३५२ धावा, द ओव्हल २०१९
सर्वात कमी धावसंख्या: २५.५ षटकात सर्व बाद ६३ धावा, सिडनी १९८१

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here