पाटणाः ( ) यांनी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची ( ) शपथ घेतली. त्यांच्यासोबत १४ मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे ( RJD) नेते तेजस्वी यादव ( ) यांनी नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला. ‘नामधारी’ मुख्यमंत्री म्हणत नितीशकुमारांवर त्यांनी टीका केली.

तेजस्वी यादव यांनी ट्विट केलं. “नामधारी मुख्यमंत्री झाल्याबद्दल नितीशकुमार यांना शुभेच्छा. खुर्चीच्या महत्त्वाकांक्षाऐवजी बिहारच्या जनतेच्या आकांक्षा आणि एनडीएने दिलेल्या १९ लाख नोकऱ्या-रोजगार आणि शिक्षण, औषध, उत्पन्न आणि सिंचन या मुद्द्यांना सरकारचे प्राधान्य राहील, अशी आशा आहे’, असं म्हणत तेजस्वी यादव यांनी एनडीएने निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली.

लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान ( ) यांनीही ट्विट करून नितीशकुमार यांना लक्ष्य केलं. “सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि आपण एनडीएचे मुख्यमंत्री राहाल. ४ लाख बिहारींनी बनवलेले बिहार फर्स्ट आणि बिहारी फर्स्टचे व्हिजन डॉक्युमेंट तुम्हाला पाठवत आहे. त्यातील जे काही काम करता येईल ते करू शकता. तुम्हाला मुख्यमंत्री केल्याबद्दल भाजपचे अभिनंदन, असं चिराग पासवान म्हणाले.

तर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही शायरीतून नितीशकुमार यांच्यावर टीका केली. ”घुटन तो उन्हें भी होगी घोंटकर गला आवाम के फ़ैसले का आज सरेआम जो सच की क़सम खा रहे हैं.”, असं ट्विट अखिलेश यादव यांनी केलंय.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री झाल्याबद्दल नितीशकुमार यांचं अभिनंदन केलं आहे. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार्‍या तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांचंही राजनाथ यांनी अभिनंदन केलं. बिहारच्या जनतेच्या आपेक्षा यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा, असं राजनाथ म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here