वाचा:
यांनी अलीकडंच भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. खडसेंच्या पक्षांतरामुळं उत्तर महाराष्ट्रात राजकीय समीकरणं बदलतील, अशी चर्चा आहे. अशातच येत्या २० व २१ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पवारांचा त्या भागातील हा पहिलाच दौरा आहे. त्या निमित्तानं खडसे शक्तिप्रदर्शन करणार असल्याचीही चर्चा आहे. याबाबत प्रसाद लाड यांना विचारलं असता खडसेंमुळं भाजपला काहीही फरक पडणार नसल्याचा दावा त्यांनी केला.
वाचा:
‘उत्तर महाराष्ट्रात भाजपला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. भाजप सक्षम आहे. आमच्या पद्धतीनं आम्ही करत आहोत. खडसेंचा उलटा प्रवास सुरू झाला आहे. स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांची तडफड सुरू आहे. त्यांना जे करायचं ते करू द्या,’ असं लाड म्हणाले. ‘शरद पवार हे मागील ५० वर्षांपासून राज्याचे दौरे करत आहेत. त्यांचे दौरे नवीन नाहीत. तो त्यांच्या आवडीचा विषय आहे. मात्र, खडसेंच्या जिल्ह्यात दौरा केल्यामुळं भाजप कमकुवत होईल, असं मानण्याचं कारण नाही,’ असंही लाड म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times