नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी ( pm modi ) यांच्या कार्यकाळात उद्योगपती ( ) यांच्या संपत्तीत वाढ झाल्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस नेते ( ) यांनी निशाणा साधला आहे. काही उद्योगपतींवर मेहरबान असल्याचा वारंवार आरोप करणारे राहुल गांधी यांनी अदानींची संपत्ती वाढल्यावरून ट्विट केलं आहे. ‘आणि तुमच्या संपत्तीत किती वाढ झाली?’ असा प्रश्न राहुल गांधी यांनी सामान्यांना केला आहे.

राहुल गांधींनी ट्विटसह एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून गौतम अदानींच्या संपत्तीत २३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अदानींची संपत्ती २६ अब्ज डॉलर्स इतकी आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे.

मोदी सरकारने फक्त काही धनाढ्य मित्रांचा ‘विकास’ केल्याचा आरोप राहुल गांधींनी अनेकदा केला आहे. देशातील ६ विमानतळं अदानी समूहाच्या ताब्यात गेली आहेत. यावरूनही राहुल गांधींनी या महिन्यात ट्विट करुन मोदी सरकारवर हल्ला चढवला. विकास होतेय, पण केवळ काही धनाढ्य ‘मित्रांचा’, असं ट्विट राहुल गांधींनी २ नोव्हेंबरला केलं होतं.

केंद्रातील मोदी सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये ६ विमानतळांचं खासगीकरण केलं आहे. यामध्ये लखनऊ, अहमदाबाद, जयपूर, मंगळरू, तिरुवनंतपूरम आणि गुवाहाटी यांचा समावेश होता. स्पर्धात्मक बोली प्रक्रियेत अदानी एंटरप्राईजेसने या विमानातळांचे सर्व हक्क मिळवले. केंद्र सरकार आणि अदानी ग्रुप यांच्यातील सामंजस्य करारामध्ये सेवा क्षेत्रातील तरतुदींचा उल्लेख आहे. यामध्ये सीमाशुल्क, इमिग्रेशन, आरोग्य, एमईटी आणि सुरक्षेची जबाबदारी भारतीय विमानतळ प्राधिकरणाची असेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here