बिहारमध्ये नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आज सोमवारी साडेचार वाजता राजभवन येथे पार पडला. रविवारी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेत जेडीयू अध्यक्ष नीतीश कुमार यांनी सरकार बनवण्याचा दावा केला. या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थ-१ अणे मार्गावर एनडीएची संयुक्त बैठक झाली. त्यात नीतीश कुमार यांची सर्वसहमतीने एनडीएच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे पर्यवेक्षक आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नीतीश कुमार यांच्या नावाची घोषणा केली.
राष्ट्रीय जनता दलाने टाकला शपथिधी सोहळ्यावर बहिष्कार
राजभवन येथे आयोजित समारोहावर राष्ट्रीय जनता दलाने आधीच घोषित केल्याप्रमाणे बहिष्कार टाकला. याबाबत राजदने आपल्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले. ‘राष्ट्रीय जनता दल शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहे. बदलाचा जनादेश हा एनडीएच्या विरोधात आहे. जनादेश ‘शासनादेशा’त बदलण्यात आला. बिहारचे बेरोजगार, शेतकरी, कंत्राटी कामगार, नियोजित शिक्षकांना विचारा त्यांची काय परिस्थिती झाली. एनडीएच्या धूर्तपणामुळे जनता त्रस्त आहे. आम्ही जनप्रतिनिधी आहोत आणि जनतेच्या सोबत उभे आहोत.’ असे राजदने ट्विटमध्ये लिहिले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
राजद नेते तेजस्वी यादव यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी शपथ ग्रहण समारंभात सहभागी होण्यासाठी निमंत्रण धाडण्यात आले होते.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times