पाटणाः बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाघाडीतील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते ( ) यांनी निवडणुकीतील पराभवाचं खापर काँग्रेससह ( ) आणि प्रियांका गांधींवर फोडत त्यांच्यावर टीका केली. माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांच्यानंतर आता बिहार काँग्रेसचे प्रभारी शक्तीसिंह गोहिल यांनी टीका करणाऱ्या शिवानंद तिवारी ( shivanand tiwari ) यांच्यावर पलटवार केला आहे.

शिवानंद तिवारींनी अनेकदा पक्ष बदलले आहेत. ते जेडीयूचे खासदारही होते. यामुळे त्यांची निष्ठा अजूनही जेडीयूशी आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. कॉंग्रेस पक्ष जेडीयू आणि बिहारमधील कमकुवत सरकारला मदत करत आहे. हा शिवानंद तिवारी यांनी केलेला आरोप निराधार आहे, असं शक्तिसिंह गोहिल म्हणाले.

महाआघाडी एकजूट ठेवण्यासाठी कॉंग्रेसने आपल्या मित्रपक्षांचा (RJD) प्रत्येक निर्णय मान्य केला. तसंच, ज्या जागांवर महाआघाडी ३० वर्षांहून अधिक काळ जिंकू शकली नाही, अशा जागांवर लढण्याचं काँग्रेसने मान्य केलं आणि त्या लढवल्या. राष्ट्रीय जनता दलाने शिवानंद तिवारींसारख्या नेत्यांना ओळखलं पाहिजे, अन्यथा आगामी काळात पक्षाला आणि बिहारला मोठं नुकसान सहन करावं लागेल, अशी टीका गोहिल यांनी तिवारींवर केली.

आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांनी रविवारी काँग्रेस पक्षासह राहुल गांधी आणि प्रियांका गांधींवर टीका केली. काँग्रेस पक्षाने बिहारमध्ये ७० जागांवर निवडणूक लढवली. पण ७० सभाही घेतल्या नाहीत. राहुल गांधी तर निवडणुकीदरम्यान शिमल्यामध्ये पिकनिकची मज्जा करत होते. प्रियांका गांधी प्रचारालाही आल्या नाही, असं म्हणत तिवारींनी बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवाचं खापर काँग्रेसवर फोडलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here