कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्ते दुखावले गेले आहेत, असं अशोक गहलोत म्हणाले. सिब्बल यांनी पक्षाचे अंतर्गत प्रश्न माध्यमांसमोर मांडण्याची गरज नाही. कॉंग्रेस अनेकदा वाईट काळ पाहिला आहे. १९६९, १९७७, १९८९ आणि १९९६ मध्ये पक्ष वाईट काळातून गेला. पण पक्षाने आपली धोरणं, विचारधारा आणि नेतृत्वावरील विश्वासाच्या जोरावर एक जोरदार पुनरागमन केलं. वाईट काळात प्रत्येक वेळी पार्टी अधिक चांगली बनत गेली. यूपीएने २००४ मध्ये सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केलं. या वेळीही आम्ही परिस्थितीवर मात करू, असं गहलोत यांनी सांगितलं.
निवडणुकीतील पराभवाची अनेक कारणं असून शकतात. प्रत्येक वेळी पक्षाने नेतृत्व आणि पदाच्या दृष्टीने धैर्य दाखवलं आहे आणि आपण वाईट स्थितीवर विजय मिळवला आहे. वाईट काळात पक्ष खंबीरपणे एकजूट राहिला आहे आणि उभरण्याचंही हेच कारण आहे. आजही कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो देशाला एकजूट ठेवू शकतो आणि सतत विकासाच्या मार्गावर जाऊ शकतो, असं गहलोत म्हणाले.
सिब्ब्ल म्हणाले होते….
पक्षात अनुभवी, संघटनात्मक स्तरावर अनुभवी आणि राजकीय परिस्थितीचे आकलन असलेल्या नेत्याची गरज आहे, असं काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल म्हणाले. तसंच आता पक्षाची आत्मचिंतनाची वेळ संपली असल्याचंही सिब्बल म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times