नवी दिल्लीः भारत बायोटेकची ( ) करोनावरील लसची (Covaxin) तिसर्‍या टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे. कंपनीने करोनावरील लशीसाठी ( ) आयसीएमआरसोबत ( ICMR ) भागीदारी केली आहे. या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सोमवारपासून सुरू झाली आहे.

जगातील एकमेव लस बनवणारी कंपनी आहे, जिच्याकडे बायोसॅफ्टी लेव्हल -३ ((BSL3) उत्पादन सुविधा आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचं अंतरिम विश्लेषण यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे. आणि २६,००० स्वयंसेवकांवर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू होणार आहे, असं गेल्या महिन्यात कंपनीने म्हटलं होतं. यासंबंधी वेबसाइटची एक लिंकही शेअर केली होती.

लशीच्या तिसर्‍या टप्प्याच्या चाचणीसाठी कंपनीने २ ऑक्टोबरला भारतीय औषध नियंत्रककडून (DCGI) परवानगी मागितली होती. त्याचबरोबर करोना संसर्ग कमी करण्यासाठी कंपनी आणखी एका लशीवर काम करत आहे. ही लस नाकातून ड्रॉपच्या रूपात दिली जाईल. ही लस पुढील वर्षापर्यंत तयार होईल.

अमेरिकेतील कंपनीचा दावा

करोनावरील लस ९४.५ टक्के प्रभावी असल्याचं सिद्ध झालं आहे. उशीराच्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीच्या प्रारंभिक डेटाच्या आधारे अमेरिकेतील कंपनी मॉडर्नाने दावा केला आहे. मॉडर्ना ही अमेरिकेची दुसरी कंपनी आहे. यापूर्वी फायझर कंपनीनेही आपली लस ९० टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. दोन्ही लशीच्या यशाचा दावा अपेक्षेपेक्षा जास्त दावा केला जातोय. बहुतेक तज्ज्ञांनी या लशी ५० ते ६० टक्के यशस्वी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केलीय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here